“मी बाथरूममध्ये आहे, फोटो पाठवू का?” ; संजय दिना पाटील यांच्या ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ

19 Jun 2026    95 Views

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या कथित बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोर खासदारांच्या यादीत नाव आल्यामुळे चर्चेत आलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या काही ऑडिओ क्लिप समोर आल्या असून, त्यातील त्यांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर संजय दिना पाटील यांचे नावही त्या यादीत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधून भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सततच्या फोन कॉल्समुळे ते संतापल्याचे ऑडिओ क्लिपमधून दिसून येते . 
 
मी बाथरूममध्ये आहे, फोटो पाठवू का?” ; संजय दिना पाटील यांच्या ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या कथित बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोर खासदारांच्या यादीत नाव आल्यामुळे चर्चेत आलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या काही ऑडिओ क्लिप समोर आल्या असून, त्यातील त्यांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर संजय दिना पाटील यांचे नावही त्या यादीत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधून भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सततच्या फोन कॉल्समुळे ते संतापल्याचे ऑडिओ क्लिपमधून दिसून येते . 

“मी बाथरूममध्ये आहे”, पत्रकारांच्या प्रश्नांवर संतप्त प्रतिक्रिया
एका संभाषणात पत्रकाराने ते मुंबईत आहेत का, अशी विचारणा केली असता संजय दिना पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. "मी सध्या बाथरूममध्ये आहे. व्हिडिओ कॉल करून दाखवू शकत नाही. तुम्हाला फोटो काढून पाठवू का?" असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी माध्यमांकडून होत असलेल्या सततच्या चौकशीबाबत नाराजी व्यक्त केली. "तुम्ही लोकांनी हैराण करून सोडले आहे. कोणाला किती त्रास द्यायचा यालाही मर्यादा असतात. मी सध्या मुंबईतच आहे. मला कुठे जायचे आहे आणि काय करायचे आहे, हे सर्वांना वेळ आल्यावर समजेल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटातील फुटीने वाढली राजकीय खळबळ

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पक्षांतर्गत मोठी खळबळ उडाली आहे. या बंडखोर खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचे नाव समोर आल्याने चर्चांना अधिक वेग आला आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला आपण पक्ष सोडणार नसल्याचे संकेत देणारे संजय दिना पाटील हे ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच संजय दिना पाटील हे ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना आणखी बळ मिळाले आहे.

संजय राऊतांपेक्षा चांगल्या शिव्या देऊ शकतो”

दुसऱ्या एका ऑडिओ क्लिपमध्येही त्यांचा संताप दिसून येतो. “मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास देऊ नका. संजय राऊत यांच्यापेक्षा चांगल्या शिव्या मी देऊ शकतो,” असे वक्तव्य त्यांनी केल्याचे समोर आले आहे. या कथित ऑडिओ क्लिप्समुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून संजय दिना पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.