हाताला सलाइन, आवाजही बंद; अभिनेत्री लीना भागवत यांच्यावर सर्जरी, चाहत्यांची चिंता वाढली
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री लीना भागवत यांच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लीना भागवत यांना आवाजाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्जरी करावी लागली आहे. सध्या त्या उपचारानंतर विश्रांती घेत असून, काही दिवस त्यांना व्यवस्थित बोलताही येणार नाही. स्वतः लीना भागवत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.लीना भागवत या मराठी रंगभूमी आणि मनोरंजन क्षेत्रातील परिचित नाव आहे. आपल्या अभिनयातील सहजता, संवादफेक आणि कॉमेडीचं अचूक टायमि...
03 Sep 2026
कार्ड बातम्या